महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी - ईद-उल-जुहा

शहरासह, अहेरी, देसाईजंग अशा अनेक ठिकाणी त्याग आणि समर्पनची शिकवण देणारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. देसाईगंज येथील जामा मस्जिद आणि मदिना मस्जिद आणि जुनी ईदगाह या ठिकाणी ईदचे नमाज पठण करण्यात आले.

गडचिरोलीत बकरी ईद उत्साहात साजरी

By

Published : Aug 12, 2019, 6:53 PM IST

गडचिरोली - शहरासह, अहेरी, देसाईजंग अशा अनेक ठिकाणी त्याग आणि समर्पणाची शिकवण देणारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. देसाईगंज येथील जामा मस्जिद आणि मदिना मस्जिद आणि जुनी ईदगाह या ठिकाणी ईदचे नमाज पठण करण्यात आले. नमाज पठणानंतर कोल्हापूर येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीवर सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी

बकरी ईजनिमित्त सर्व बांधवांनी ऐकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. देसाईगंज शहरात बकरी-ईदनिमित्त चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे, पोलीस प्रशासनातर्फे गुलाबाचे फूल देऊन मुस्लिम बांधवाना शुभेछा देण्यात आल्या. मुस्लिम समुदायाचे लोक रमजान संपल्यावर किमान 70 दिवसांनंतर बकरी ईदचा सण साजरा करतात. याला ईद-उल-जुहा देखील म्हणतात. ईद-उल-फितर (मिठी ईद) नंतर मुस्लिम समुदायाच्या सर्वात मोठ्या सणांमध्ये बकरी ईद एक आहे. या दिवशी मुस्लीम बांधवांच्या घरी बकर्‍याची कुर्बानी देण्याची प्रथा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details