महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृत्रिमरीत्या सापांची अंडी उबवून पिल्लांना जन्म; गडचिरोलीच्या सर्पमित्रांचा प्रयोग यशस्वी - गडचिरोलीच्या सर्पमित्रांचा प्रयोग यशस्वी

कृत्रिमरीत्या सापांची अंडी उबवून सापांच्या पिल्लांना जन्म देण्याचा प्रयोग गडचिरोली येथील सर्पमित्रांनी यशस्वी केला आहे. ७ पैकी ५ पिलांना जन्म देण्यात प्रयोग सर्पमित्रांना यश आले.

कृत्रिमरीत्या सापांची अंडी उबवून पिल्लांना जन्म; गडचिरोलीच्या सर्पमित्रांचा प्रयोग यशस्वी

By

Published : Nov 7, 2019, 1:11 PM IST

गडचिरोली - कृत्रिमरीत्या सापांची अंडी उबवून सापांच्या पिल्लांना जन्म देण्याचा प्रयोग गडचिरोली येथील सर्पमित्रांनी यशस्वी केला आहे. ७ पैकी ५ पिलांना जन्म देण्यात प्रयोग सर्पमित्रांना यश आले. यावर तब्बल ५८ दिवस काम चालू होते. सर्पमित्र अजय कुकडकर यांनी हा प्रयोग केला.

कृत्रिमरीत्या सापांची अंडी उबवून पिल्लांना जन्म; गडचिरोलीच्या सर्पमित्रांचा प्रयोग यशस्वी

हेही वाचा - 'ई टीव्ही भारत'च्या वृत्तानंतर कचरा प्रश्नावरून शिवसेना आक्रमक; महापालिका आयुक्तांना दिले गाजर भेट

कुकडकर यांनी ७ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात तस्कर जातीच्या बिनविषारी सापाला पकडले होते. या सापाला पकडल्यानंतर काहीवेळातच सापाने ७ अंडी दिली. पावसाळ्याचे दिवस असल्याने व सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळे अंडी ठेवायची कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. यामुळे त्यांनी सापाला सुखरूप सोडून देत कृत्रिमरीत्या उबवून अंड्यांना जीवनदान देण्याचा निर्णय घेतला.

याबाबत गडचिरोली वनपरीक्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक प्रमोद जेनेकर यांना माहिती देवून सापाची अंडी सुरक्षितरीत्या एका प्लास्टिकच्या बाटलीत ठेवले. सर्पमित्र अजय कुकडकर, प्रशिक झाडे, पंकज फरकाडे, मयुर सिडाम यांनी अंडी सुरक्षित राहावी यासाठी आवश्यक वातावरण निर्मिती केली. दररोज अंड्यांची देखभाल केली. यासाठी काही भंडारा येथील अनुभवी सर्पमित्रांची मदत घेण्यात आली. या सर्व प्रक्रियेनंतर मंगळवारी अंड्यांमधून पाच पिल्लांनी जन्म घेतला तर दोन अंडी खराब झाले. या पिल्लांना सुखरूप जंगलात सोडून देण्यात आले. यावेळी क्षेत्रसहाय्यक प्रमोद जेनेकर, मनोज पिपरे, दैवत बोदेले, गणेश देवावार, सचिन जिवतोडे, होमदेव कुरवटकर, निरज सावळे, मकसूद सय्यद, गोलू जुवारे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - नांदेडमध्ये दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांचे बारा लाख पळवले, धूम स्टाईल चोरटे सक्रिय

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details