गडचिरोली - जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या दुर्गम तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयातील रिक्त 28 पदावरील गट 'अ' दर्जाच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी नियुक्त्या करण्यात आल्या. यासाठी महाराष्ट्रात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने 35 हून अधिक उमेदवारांच्या मुलाखती घेवून त्यापैकी 22 जणांची नियुक्ती करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टन्सिंगची अंमलबजावणी करून राज्यातील वेगवेगळया उमेदावरांनी आपल्या मुलाखती व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पूर्ण केल्या. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या नाविण्यपूर्ण कल्पनेतून या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात आली.
राज्यात प्रथमच ऑनलाईन मुलाखतीद्वारे गडचिरोलीत 22 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या - gadchiroli covid 19 sitution
जिल्हा निवड समितीकडून 1 एप्रिल रोजी गट 'अ' च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत जाहिरात काढण्यात आली होती. जिल्ह्यातील विविध ठिकाणी 28 वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत अर्ज मागविण्यात आले होते. दुर्गम भागात मोठया प्रमाणात रीक्त पदे असल्यामुले आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया तातडीने पूर्णत्वास नेण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी 22 जणांना नियुक्ती पत्र दिले. येत्या आठ दिवसात त्यांना रूजू होण्यासाठी कळविण्यात येणार आहे.

जिल्हा निवड समितीमध्ये जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे बरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहूल गुप्ता, सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतूरे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांचा समावेश होता. तर या समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी काम पाहिले.
गडचिरोली जिल्हा आदिवासी आणि दुर्गम म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी नेहमीच आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त असतात. यासाठी जिल्हा निवड समितीने यावेळी नियुक्त केलेल्या वैद्यकिय अधिकाऱ्यांना सलग तीन वर्षाचा करार करून नोकरी न सोडण्याची अट घातली आहे. यानुसार बॉण्ड करण्यास तयार असलेल्या २२ उमेदवारांना नियुक्ती देण्याचे ठरविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचारी संख्येची गरज आणि काम करण्यासाठी तयार असलेल्या लोकांच्या संख्येमध्ये नेहमीच तफावत आढळून येते. जिल्हा दुर्गम असल्या कारणाने याठिकाणी सामाजिक बांधिलकीतून लोकांनी सेवा देणे गरजेचे आहे. आम्ही रिक्त पदे तातडीने भरली जावीत म्हणून अतिशय सोप्या पद्धतीने निवड प्रक्रिया राबविली. वेगवेगळया जिल्ह्यातून यामध्ये बीड, भंडारा, नागपूर, नांदेड येथून अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घरी बसूनच ऑनलाईन पद्धतीने घेतल्या. एकुण २२ वैद्यकिय अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश देत असून, या नियुक्त्या कायम स्वरूपी असतील. यामध्ये त्यांना तीन वर्ष तरी नोकरी सोडता येणार नाही. यातून गरज असलेल्या दुर्गम भागात आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी सांगितले.