महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोगस बियाणांची विक्री रोखण्यासाठी दक्षता घ्या - जिल्हाधिकारी - Allocation of chemical fertilizers

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे बियाणे व साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथके तसेच तक्रार निवारण समित्या स्थापन केलेल्या आहेत. भरारी पथकामार्फत जिल्ह्यातील गुणवत्ता निरीक्षकाकडून बोगस बियाणे व खतांवर विविध टप्प्यांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.

जिल्हाधिकारी दीपक सिंगला
जिल्हाधिकारी दीपक सिंगला

By

Published : May 16, 2020, 8:24 AM IST

गडचिरोली - चालू वर्षी खरीप हंगामासाठी कृषी आयुक्तालयाकडून गडचिरोली जिल्ह्यासाठी एकूण 52 हजार 500 मेट्रिक टन वेगळ्यावेगळ्या ग्रेडच्या रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले. येत्या खरीप हंगामात टप्याटप्प्याने जिल्ह्यात खते प्राप्त होतील.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे बियाणे व साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथके तसेच तक्रार निवारण समित्या स्थापन केलेल्या आहेत. भरारी पथकामार्फत जिल्ह्यातील गुणवत्ता निरीक्षकाकडून बोगस बियाणे व खतांवर विविध टप्प्यांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. अधिकाऱ्यांनी दक्ष राहून काळाबाजार रोखावे, असे आवाहन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.

जिल्हा कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. या बैठकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे उपस्थित होते. बैठकीमध्ये येत्या खरीप हंगाम 2020 च्या पूर्व तयारीबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये खते, बियाणे, किटकनाशके यांची मागणी, पुरवठा वाहतूक यांचे नियोजन करण्यात आले. येत्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये भात पिकाची 19 हजार 5000 क्षेत्रावर लागवड होईल, असे निर्धारित केले आहे. त्यानुसार महाबीज व खासगी कंपन्यामार्फत बियाणे पुरवठा होणार आहे.

सध्यस्थितीत जिल्ह्यात कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागु केलेली आहे. परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी जमीन तयार करणे, बियाणे व खतांची पुरेशी साठवणूक करणे इत्यादी बाबी आवश्यक ठरतात. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते व शेतीशी निगडीत दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काही अटींच्या अधीन राहून सुरू ठेवण्याबाबत परवानगी दिली आहे. तसेच शेतीकामासाठी शेतकऱ्यांना पूर्णवेळ मुभा असणार आहे, असेदेखील जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details