महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 28, 2020, 9:21 AM IST

Updated : Mar 28, 2020, 10:39 AM IST

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट: गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व लेखी-प्रात्यक्षिक परीक्षा स्थगित

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपर्यंत कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे, ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व पदवी व पदव्युत्तर विभागाच्या लेखी परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.

corona gadchiroli
गोंडवाना विद्यापीठ

गडचिरोली- कोरोना विषाणूचा वाढता प्रसार बघता गोंडवाना विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कुलगुरू यांच्या मान्यतेने पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. गोंडवाना विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी ही माहिती दिली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपर्यंत कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे, ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व पदवी व पदव्युत्तर विभागाच्या लेखी परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच १ ते ८ एप्रिल दरम्यान महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षा सुद्धा स्थगित करण्यात आल्या आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक लवकरच कळविण्यात येणार असल्याचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी पत्रकाच्या माध्यमातून कळविले.

हेही वाचा-कोरोना इफेक्ट : 'लॉक डाऊन'मुळे शेकडो क्विंटल रताळी मातीमोल

Last Updated : Mar 28, 2020, 10:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details