गडचिरोली - गेल्या 48 तासांपासून जिल्ह्यासह गडचिरोलीत मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गसह तब्बल 12 प्रमुख मार्ग कालपासून बंद आहेत. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात 95 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून तब्बल 7 तालुक्यांमध्ये 100 हून अधिक मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गडचिरोलीत मुसळधार पाऊस; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - गडचिरोलीत मुसळधार पाऊस
गेल्या 24 तासात गडचिरोलीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. गडचिरोली तालुक्यात 107, धानोरा 141, चामोर्शी 101, मुलचेरा 70, देसाईगंज 140, आरमोरी 118, कुरखेडा 143, कोरची 82, अहेरी 35, सिरोंचा 7, एटापल्ली 160, तर भामरागड तालुक्यात 39 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या 24 तासात गडचिरोली तालुक्यात 107, धानोरा 141, चामोर्शी 101, मुलचेरा 70, देसाईगंज 140, आरमोरी 118, कुरखेडा 143, कोरची 82, अहेरी 35, सिरोंचा 7, एटापल्ली 160, तर भामरागड तालुक्यात 39 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्ग मंगळवारपासूनच बंद असून आजही आष्टी-चंद्रपूर हा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे.
गोसेखुर्द धरणाचे 29 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे चिचडोह बॅरेज प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सद्यस्थितीत येथील पाणीपातळी आठ मीटर म्हणजेच 26 ते 27 फुटावर पोहोचली आहे. पाऊस कायम राहिल्यास मोठी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.