गडचिरोली- मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ग्राम परिवर्तक नियुक्त करण्यात आले आहेत. या अभियानांतर्गत समाविष्ट मुलचेरा तालुक्यातील लगाम ग्रामपंचायतीच्या ग्राम परिवर्तकावर काही अज्ञातांनी अॅसिड टाकल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. या घटनेत परिवर्तक समाधान कस्तुरे (वय 25 वर्ष) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्याच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री ग्राम परिवर्तकावर अॅसिड हल्ला; प्रकृती चिंताजनक - chndrapur
गडचिरोलीत मुख्यमंत्री ग्राम परिवर्तकावर अज्ञातांचा अॅसिड हल्ला.... घटनेत परिवर्तक समधान कस्तुरेंची प्रकृती गंभीर... मुलचेरा तालुक्यातील लगाम ग्रामपंचायतीमध्ये होते कार्यरत
मुलचेरा तालुक्यातील लगाम ग्रामपंचायत कार्यालयात परिवर्तक म्हणून कार्यरत नामे समाधान कस्तुरे हे आपल्या खोलीत झोपेत असताना मध्यरात्री अज्ञात इसमांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून अॅसिड हल्ला केला. यामध्ये त्यांच्या शरीराचे बहुतांश भाग भाजला आहे. कस्तुरे यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच लगामचे सरपंच मनीष मारटकर यांनी बुधवारी मध्यरात्री 2.25 च्या सुमारास उपचारासाठी चंद्रपुरात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मा. शेखर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी लगामचे सरपंच मनीष मारटकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती घेतली आहे. समाधान कस्तुरे यांच्या प्रकृती बद्दल विचारणा केली. अॅसिड हल्ला करणारे नेमके किती जण आहेत याची माहिती कळू शकली नाही. दरम्यान, या घटनेचा सर्वांकडून निषेध करण्यात येत आहे.