ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आपसी वादातून काकाचा खून, नक्षलवाद्यांनी मारल्याचा केला होता बनाव; चार जणांना अटक - Naxalite in gadchiroli

गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात आपसी वादातून नातेवाईकाचा खून केला. मात्र, त्यांना नक्षलवाद्यांनी मारल्याचा बनाव आरोपीने केला. अखेर पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.

murdered crime
हत्या खून
author img

By

Published : Feb 28, 2020, 2:44 PM IST

गडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील कोटमी-कसनसुर रस्त्यावरील झुरी गावाजवळ डिसेंबर महिन्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. अज्ञात आरोपींनी त्या व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करुन मृतदेह रस्त्यावर फेकला होता. घटनास्थळी मृत व्यक्ती हा पोलिसांचा खबरी असल्याची चिठ्ठी लिहून ठेवलेली होती. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला होता. मात्र, तपासा दरम्यान ही हत्या नक्षलवाद्यांनी केली असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा...दिल्लीत हिंसेचा धूर निघत असताना गृहमंत्री कुठे? सेनेचा भाजपला सवाल

मृत व्यक्तीचे नाव सोनू जोगी गोटा (३५ रा. बिड्री ता. एटापल्ली) असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी त्यानंतर अधिक तपास केला. त्यावेळी घटनास्थळी मृतदेहाजवळ सापडलेल्या हस्तलिखित चिठ्ठीवरुन हत्या करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला. विनोद रामजी गोटा (१६ रा. बिड्री) सुकरु ऊर्फ मल्लेश दलसु मट्टामी (२८ रा. गडेरी) भाऊजी मिरचा गोटा (२४ रा. गडेरी) सागर येसु कुमरे (२२ रा. गडेरी ता. एटापल्ली) या संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

त्यावेळी आरोपींनी मृत सोनु गोटा आणि आरोपी विनोद गोटा हे नात्याने काका-पुतणे असल्याचे सांगितले. जमिनीच्या वाटणीवरुन व धानाचे पीक जाळल्याच्या वादातून विनोदने मनात राग धरला होता. त्यामुळे इतर तीन साथीदारांच्या सहाय्याने सोनू गोटा गावातील शेतात झोपलेला असताना विनोदने त्याची हत्या केली असल्याचे स्पष्ट झाले. या चारही आरोपींना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांना चंद्रपुर कारागृहात पाठवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details