गडचिरोली- अहेरी तालुक्यातील गोलाकर्जी येथील एक महिला एका आठवड्यापासून आजारी होती. तिला उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र प्रकृती ठिक न झाल्याने तिला अहेरी येथून जिल्हा रुग्णालय गडचिरोलीला पाठवण्यात आले. दरम्यान बुधवारी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. बोंदुबाई विठ्ल मडावी (वय ६० वर्ष) असे महिलेचे नाव आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आदिवासी महिलेचे पार्थिव पाठवले स्वगावी - aadivasi woman death news
कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अहवाल प्राप्त होईपर्यंत महिलेचा मृतदेह पाच दिवस गडचिरोली येथील शवागारात ठेवण्यात आला होता. पाच दिवसानंतर तिचा कोरोना निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर तिचे पार्थिव नातेवाईकांना सोपवले. मात्र या गरीब आदिवासी महिलेचे नातेवाईक संभ्रमावस्थेत होते. त्यांची ही स्थिती बघून विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या महिलेचे शव गोलकर्जी येथे पाठवण्यासाठी गाडी उपलब्ध करून दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या महिलेची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अहवाल प्राप्त होईपर्यंत महिलेचा मृतदेह पाच दिवस गडचिरोली येथील शवागारात ठेवण्यात आला होता. पाच दिवसानंतर तिचा कोरोना निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांना सोपवला. मात्र या गरीब आदिवासी महिलेचे नातेवाईक संभ्रमावस्थेत होते. त्यांची ही स्थिती बघून विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या महिलेचा मृतदेह गोलकर्जी येथे पाठवण्यासाठी गाडी उपलब्ध करून दिली.
यासाठी स्थानिक कार्यकर्ते, ग्राम पंचायत सदस्य सुधाकर आत्राम, माधव कूळमेथे, अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आदिवासी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते शिवराम पूल्लूरी व मिथुन देवगडे यांनी पुढाकार घेतला.