महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार - गडचिरोली

नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताह दरम्यान सोमवारी गडचिरोलीतील गरंजी गावानजीकच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली आहे.

नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार

By

Published : Jul 29, 2019, 4:08 PM IST

Updated : Jul 29, 2019, 6:00 PM IST

गडचिरोली -नक्षलवाद्यांकडून शहीद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या शहीद सप्ताह दरम्यान सोमवारी पोटेगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत गरंजी गावानजीकच्या जंगलात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २८ जुलैपासून नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरु झाला आहे. या सप्ताहात नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया होऊ नये म्हणून सर्वत्र नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानाअंतर्गत पोलीस व सी-६० पथकाच्या जवानांची सोमवारी दुपारी गरंज गावानजीकच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला होता. नक्षलवाद्यांनी काही वेळाने तिथून पळ काढला. नंतर घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना एका महिला नक्षलीचा मृतदेह आढळून आला. तसेच घटनास्थळाहून एक १२ बोअर बंदूक, १३ पिट्टू व अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे. घटनास्थळ परिसरात अजूनही अभियान सुरू आहे. दरम्यान ठार झालेल्या महिला नक्षलीची ओळख अजून पटलेली नाही.

Last Updated : Jul 29, 2019, 6:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details