महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्यात 173 कोरोनामुक्त; 4 मृत्यूसह 97 नवीन कोरोनाबाधित - Corona patient death toll Gadchiroli

आज जिल्ह्यात 97 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच, आज 173 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 29 हजार 237 बाधितांपैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 27 हजार 473 वर पोहचली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : May 29, 2021, 8:38 PM IST

गडचिरोली - आज जिल्ह्यात 97 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच, आज 173 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 29 हजार 237 बाधितांपैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 27 हजार 473 वर पोहचली आहे. तसेच, सद्या 1 हजार 50 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 714 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

हेही वाचा -'पोलीस दादालोरा खिडकी'कडून बियाणे अनुदानाची मोफत नोंदणी

आज 4 नवीन मृत्यूंमध्ये रा. खाकरी ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 43 वर्षीय पुरुष, रा. कोंडाळा ता. वडसा जि. गडचिरोली येथील 67 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.97 टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण 3.59 टक्के, तर मृत्यू दर 2.44 टक्के इतका आहे.

नवीन 97 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 13, अहेरी तालुक्यातील 01, आरमोरी 06, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 07, धानोरा तालुक्यातील 03, एटापल्ली तालुक्यातील 11, कोरची तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील 08, मुलचेरा तालुक्यातील 29, सिरोंचा तालुक्यातील 08 तर वडसा तालुक्यातील 09 जणांचा समावेश आहे. तर, आज कोरोनामुक्त झालेल्या 173 रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील 34, अहेरी 19, आरमोरी 11, भामरागड 05, चामोर्शी 28, धानोरा 10, एटापल्ली 04, मुलचेरा 20, सिरोंचा 22, कोरची 02, कुरखेडा 03 तसेच वडसा येथील 15 जणांचा समावेश आहे.

हेही वाचा -कोरोना योद्ध्या आशा सेविकांचा लाहेरीत सत्कार

ABOUT THE AUTHOR

...view details