महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंडवाना विद्यापीठाचे 95 टक्के विद्यार्थी 'ऑनलाइन' तर 706 विद्यार्थी देणार 'ऑफलाइन' परीक्षा - गडचिरोली शिक्षण बातमी

गोंडवाना विद्यापीठाचे 95 टक्के विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने परिक्षा देणार असून 706 विद्यार्थी परिक्षा केंद्रावर हजर राहून परिक्षा देणार आहेत.

बैठकीत उपस्थित शिक्षण मंत्री सामंत
बैठकीत उपस्थित शिक्षण मंत्री सामंत

By

Published : Sep 14, 2020, 10:55 PM IST

गडचिरोली - गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील 17 हजार 229 विद्यार्थी अंतिम वर्षांची परीक्षा देणार आहेत. यामध्ये चालु वर्षाचे 15 हजार 153 विद्यार्थी, मागील वर्षी विषय राहिलेले 2 हजार 13 विद्यार्थी तर बहिस्थ 63 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना घरातूनच परिक्षा द्यावी, असे प्राधान्य देण्यात आले असून यानूसार 95 टक्के विद्यार्थी घरातूनच ऑनलाइन परिक्षा देण्यास तयार झाले आहेत. तर 706 विद्यार्थी तांत्रिक अडचणीमुळे तसेच स्वत: निर्णय घेवून प्रत्यक्ष परीक्षा देणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (दि. 14 सप्टें.) विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठाच्या विविध विषयांवर बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले, परिक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, सहाय्यक जिल्हाधिकारी आशिष ऐरेकर आदी उपस्थित होते.

पुढे मंत्री सामंत म्हणाले, अंतिम परिक्षेआधी किमान 5 वेळा चाचणी विद्यार्थ्यांची घेण्यात येणार आहे. यातून त्यांना परिक्षेसंबंधी प्रक्रिया लक्षात येईल. तसचे प्रत्येक अभ्यासक्रमाचा प्रश्न संचही वाटप करण्यात येणार आहे. अंतिम परिक्षेचा निकाल घोषित करताना 50 टक्के परिक्षेचे गुण ग्राह्य धरणार आहेत. तर 50 टक्के इन्टरर्नलचे गुण ग्राह्य धरणार आहेत. ऑनलाइन परिक्षेमध्ये ऐनवेळी तांत्रिक अडचणी आल्यास विद्यार्थ्यांना 15 दिवसांनी पुन्हा संधी देण्यात येणार आहे. अनुर्तीण विद्यार्थ्यांनाही पुन्हा तातडीने परिक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे, असे मंत्री सावंत म्हणाले.

विद्यापीठात डेटा सेंटर

विद्यापीठात आवश्यक डेटा सेंटर तयार करण्याबाबत वारंवार मागणी होती. त्याबाबत तातडीने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यासाठी 2.45 कोटी देण्यात आले आहेत. सध्या या डेटा सेंटरचे काम सुरु झाले असून येत्या महिना अखेरपर्यंत ते पूर्ण होईल, असे उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

विद्यापीठांच्या जागा खरेदीबाबत प्रश्नांवर चर्चा

विद्यापीठाच्या जागेच्या प्रश्नासह इतर भौतिक सुविधांचे प्रश्नही मार्गी लावण्यात येणार आहेत, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. परिक्षा केंद्र, प्रशासकीय इमारत यासाठी आवश्यक निधीही दिली जात आहे. 35 एकर जागेची खरेदी झाली असून आणखी 15 एकर जागा खरेदी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यापिठाच्या जमीन खरेदीसाठीचे 79 कोटी शिल्लक असून हा निधी विद्यापीठाच्या भौतिक संसाधन विकासासाठी वापरण्यात यावे, असे सरकारतर्फे आश्वासन मिळाले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन दुसऱ्या टप्प्याचेही नियोजन मार्गी लागत आहे. यासाठी केंद्रीय स्तरावरुन निधी मिळविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत पाठपुरावा सुरु आहे असे ते म्हणाले.

हेही वाचा -प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा 'त्या' कुटुंबाला मिळाला आर्थिक आधार

ABOUT THE AUTHOR

...view details