गडचिरोली- कोरची येथुन हैदराबाद येथे कत्तलीसाठी जाणारा जनावरांचा कंटेनर पोलिसांनी पकडुन 91 जनावरांची सुटका केली. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरमोरी हद्दीतील वैरागड टी-पॉईंट येथे गुरुवारी कारवाई करण्यात आली.
कोरची येथुन हैदराबाद येथे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तीन कंटेनर ताब्यात घेतले. या कंटेनरची पाहणी केली असता त्यामध्ये ९१ जनावरे आढळुन आली. तर ४ जनावरे मृतावस्थेत आढळून आली. दरम्यान, पोलिसांनी जनावरे व कंटेनर असा एकूण ७६ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी शाहरुख गफ्फार खान, मोहम्मद शकील समशेर (रा. हैदराबाद), अल्ताफ अक्बर शेख (रा. गडचांदुर), इब्राहिम खान हमीद खान (रा. हैदराबाद) यांना ताब्यात घेतले.