गडचिरोली- रस्ता बांधकामावरील मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचे मागील चाक निखळल्याने झिमेला नाक्यावर अपघात झाला. यामध्ये 8 जण गंभीर तर 1 जण किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास मौसम-नंदीगाव मार्गावरील झिमेला नाक्यावर घडली. यामधील 8 मजूरांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
गडचिरोलीत मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले, 9 जण जखमी
रस्ता बांधकामावरील मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचे मागील चाक निखळल्याने झिमेला नाक्यावर अपघात झाला. यामध्ये 8 जण गंभीर तर 1 जण किरकोळ जखमी झाला आहे.
गंभीर जखमीमध्ये निरंजना मोहुर्ले, वनिता मोहुर्ले, बादल कोटरंगे, ईश्वर मोहुर्ले, मंदा हजारे, सुजाता निखाडे, श्वेता गुरनुले (सर्व रा. बोरी) यांचा समावेश आहे. तर आकाश मोहुर्ले याला किरकोळ जखम झाली आहे. अहेरी तालुक्यातील बोरी येथील जवळपास 14 मजूर रस्ता बांधकामासाठी सिरोंचा तालुक्यात गेले होते. हे सर्व मजूर एका वाहनात बसून आपल्या गावाकडे परत येत असताना हा अपघात झाला.
दरम्यान, मौसम- नंदीगाव मार्गावरील झिमेला नाक्याजवळ पिकअपचे मागील चाक अचानक निखळल्याने सदर वाहन 3 वेळा पलटी झाले. यातील 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर चंद्रपुरला उपचारासाठी हलवण्यात आले. तर एकावर अहेरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.