गडचिरोली- पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा आणि हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून चातगाव दलमच्या 7 नक्षलवाद्यांनी आज (बुधवार) गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. संपूर्ण दलम सदस्य आत्मसमर्पण करण्याची बहुतेक ही पाहिलीच वेळ आहे. या सातही जणांवर जाळपोळ, भूसुरुंग, हत्या असे विविध स्वरूपाचे गुन्हे असल्याने शासनाने त्यांच्यावर 33 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
राकेश उर्फ गणेश सनकु आचला (वय ३४ वर्षे) माओवादी असून तो जून २००६ मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला होता. जानेवारी २०१२ पासून ते आजपर्यंत तो माओवाद्यांच्या चातगाव दलमच्या कमांडर पदावर कार्यरत होता. त्याच्यावर २० चकमकीचे, ७ खुनाचे, ०२ जाळपोळीचे गुन्हे दाखल आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर ०५ लाख ५० हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
हेही वाचा - 'पेलोड ड्रोन'द्वारे माओवादी सुरक्षा दलांवर बॉम्ब हल्ला करण्याची शक्यता
देविदास उर्फ मनिराम सोनू आचला (वय २५ वर्षे) हा माओवादी आहे. जानेवारी २०११ मध्ये चातगाव दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला. २०१४ पासून आजपर्यंत चातगाव दलमच्या उपकमांडरपदी कार्यरत होता. त्यावर चकमकीचे ०९ खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे शासनाने ०५ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. रेश्मा उर्फ जाई दुलसु कोवाची (वय १९ वर्षे) माओवादी आहे. २०१७ मध्ये चातगाव दलमच्या सदस्य पदावर भरती झाली होती. आजपर्यंत चातगाव दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे ०२ व खुनाचा एक गुन्हा दाखल आहे. महाराष्ट्र शासनाने तिच्यावर ०४ लाख ५० हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अखिला उर्फ राधे झुरे (वय २७ वर्षे) माओवादी आहे. २०१२ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाली होती. मे २०१९ पासून चातगाव दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे ०९ गुन्हे, खुनाचे ०३ गुन्हे व जाळपोळीचे ०३ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र शासनाने ४ लाख ५० हजार रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते. शिवा विज्या पोटावी (वय २२ वर्षे) माओवादी आहे. २०१४ मध्ये कसनसुर दलममध्ये भरती झाला होता. तो सप्टेंबर २०१८ पासून चातगाव दलममध्ये कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे ०३ गुन्हे दाखल आहे. महाराष्ट्र शासनाने ४ लाख ५० हजार रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
हेही वाचा - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला; मोठा शस्त्रसाठा जप्त