महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीत आणखी सात जणांची कोरोनावर मात... - Gadchiroli corona cure patient

गडचिरोली जिल्ह्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील आणखी सात कोरोना बाधित रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Gadchiroli corona update
गडचिरोली कोरोना अपडेट

By

Published : Jun 4, 2020, 3:26 PM IST

गडचिरोली -जिल्ह्यातील आणखी सात कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बरे झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे उपस्थित होते.

घरी सोडण्यात आलेले सातही जण एटापल्ली तालुक्यातील आहेत. सात जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे जिल्ह्यातील एकुण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या १९ झाली आहे. तर सद्या १९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तर एक जणाचा यापुर्वी १ जूनला हैदराबाद येथे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

रुग्णांना दवाखान्यातून डिस्चार्ज देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विनोद मशाखेत्री आदी उपस्थित होते. तर टाळयांच्या गजरात त्यांना निरोप देण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details