गडचिरोली - आज जिल्ह्यात 615 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तसेच आज 287 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित 15,929 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 12,242 वर पोहचली. तसेच सध्या 3,447 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 240 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
मंगळवारी 15 मृत्यू..
आज जिल्ह्यात १५ नव्या कोरोना बळींची नोंद झाली. यांमध्ये 55 वर्षीय पुरुष (अहेरी), 65 वर्षीय महिला (नवेगाव, गडचिरोली), 72 वर्षीय पुरुष (माडगांव, ता. लाखांदूर जि. भंडारा), 82 वर्षीय पुरुष (चामोर्शी), 44 वर्षीय महिला (आरमोरी), 52 वर्षीय पुरुष (गडचिरोली), 45 वर्षीय पुरुष (माडेतुकूम, गडचिरोली), 70 वर्षीय पुरुष (घोट,ता. चामोर्शी), 69 वर्षीय पुरुष (चामोर्शी), 53 वर्षीय पुरुष (उमरेड, जि. नागपूर), 49 वर्षीय पुरुष (गडचिरोली), 52 वर्षीय पुरुष (आरमोरी), 71 वर्षीय पुरुष (अर्जुनी मोरगाव, जि.गोंदिया), 60 वर्षीय महिला (गडचिरोली), 45 वर्षीय पुरुष (नागपूर) यांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.85 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 21.64 टक्के, तर मृत्यू दर 1.51 टक्के झाला.
या तालुक्यात आढळले बाधित..
नवीन 615 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 185, अहेरी तालुक्यातील 46, आरमोरी 40, भामरागड तालुक्यातील 30, चामोर्शी तालुक्यातील 64, धानोरा तालुक्यातील 28, एटापल्ली तालुक्यातील 50, कोरची तालुक्यातील 30, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 34 , मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 42, सिरोंचा तालुक्यातील 06, तर वडसा तालुक्यातील 60 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 287 रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील 109, अहेरी 40, आरमोरी 19, भामरागड 12, चामोर्शी 17, धानोरा 14 , एटापल्ली 06, मुलचेरा 07, सिरोंचा 03, कोरची 28, कुरखेडा 15, तसेच वडसा येथील 17 जणांचा समावेश आहे.