गडचिरोली -जिल्हयात बुधवारी 590 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तसेच 177 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 16 हजार 519 पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 12 हजार 419 वर पोहचली आहे. तसेच सध्या 3839 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गडचिरोलीत 590 कोरोनाबाधितांची वाढ, 21 जणांचा मृत्यू - गडचिरोली कोरोना बातमी
गडचिरोलीत बुधवारी 590 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तसेच 177 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात सध्या 3839 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात 261 जणांचा मृत्यू -
गडचिरोलीमध्ये आतापर्यंत एकूण 261 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.18 टक्के आहे. तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 23.24 टक्के आहे. मृत्यूदर 1.58 टक्के झाला आहे.
या तालुक्यात आढळले रुग्ण -
नवीन 590 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 181, अहेरी तालुक्यातील 51, आरमोरी 70, भामरागड तालुक्यातील 13, चामोर्शी तालुक्यातील 35, धानोरा तालुक्यातील 35, एटापल्ली तालुक्यातील 39, कोरची तालुक्यातील 18, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये 47, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये 10, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये 18 तर वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये 73 जणांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या 177 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 87, अहेरी 03, आरमोरी 16, भामरागड 05, चामोर्शी 29, धानोरा 13, एटापल्ली 02, मुलचेरा 01, सिरोंचा 02, कोरची 01, कुरखेडा 13, तसेच वडसा येथील 05 जणांचा समावेश आहे.
हेही वाचा -Maharashtralockdown : राज्यात आजपासून कडक निर्बंध लागू; नवीन नियमावली जाहीर