महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुर्योधन रायपुरे हत्याप्रकरणी १५ दिवसांत मुख्य आरोपीसह ५ अटकेत - gadchiroli Duryodhan Raipure

अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी गडचिरोली नगर परिषदेचा सभापती प्रशांत खोब्रागडे असून त्यांनीच राजकीय वैमनस्यातून दुर्योधन रायपुरे यांची हत्या करण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिल्याचे आता समोर आले आहे.

gadchiroli Duryodhan Raipure
gadchiroli Duryodhan Raipure

By

Published : Jul 10, 2021, 4:00 PM IST

Updated : Jul 10, 2021, 4:08 PM IST

गडचिरोली -येथील सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपुरे यांची 24 जूनच्या रात्री हत्या झाली. या प्रकरणी पंधरा दिवसात पोलिसांनी मुख्य आरोपीसह 5 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी गडचिरोली नगर परिषदेचा सभापती प्रशांत खोब्रागडे असून त्यांनीच राजकीय वैमनस्यातून दुर्योधन रायपुरे यांची हत्या करण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिल्याचे आता समोर आले आहे.

आरोपींनी दिली कबुली

दुर्योधन रायपुरे हे गडचिरोली शहरातील फुले वॉर्डात वास्तव्याने होते. गोरगरीब नागरिकांची कामे करणे, हा त्यांचा नित्यक्रम होता. दरम्यान 24 जून रोजी राहत्या घरात त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाची चक्रे फिरवली असता, पहिल्या आरोपीला गोंदिया येथून अटक करण्यात आली. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आणखी चार जणांना गोंदिया जिल्ह्यातूनच अटक करण्यात आली. चौघांचीही चौकशी केली असता नगरपालिकेचे सभापती प्रशांत खोब्रागडेने दुर्योधन रायपुरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे आरोपींनी कबूल केले. शुक्रवारी सभापती प्रशांत खोब्रागडे यालाही गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.

रायपुरे यांना संपवण्याचा कट

आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय अडथळा बाजूला करण्याच्या दृष्टीने संभाव्य उमेदवार म्हणून दुर्योधन रायपुरे यांना संपवण्याचा कट प्रशांत खोब्रागडे याने रचला. यासाठी त्याने गोंदिया जिल्ह्यातील पाच जणांना पाच लाखांची सुपारी दिली होती. त्यापैकी 50 हजार रुपये अदा करण्यात आले होते, अशी माहिती गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांनी दिली आहे.

Last Updated : Jul 10, 2021, 4:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details