महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीत कोरोनाबाधितांचा आकडा 44 वर, आत्तापर्यंत 31 जण कोरोनामुक्त - corona patients in Gadchiroli

आतापर्यंत जिल्ह्यात ४४ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर १२ अॅक्टीव रुग्ण आहेत, तर ३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

Gadchiroli Corona News
गडचिरोली कोरोना बातमी

By

Published : Jun 8, 2020, 9:36 PM IST

गडचिरोली - मुंबईहून शहरात आलेल्या 5 प्रवाशांपैकी आणखी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे एकूण अॅक्टीव रुग्णांची संख्या १६ झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 42 झाली आहे. तर 31 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

गडचिरोलीत २७ मे ला मुंबईहून ५ प्रवासी आले होते. त्यापैकी ४ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यात एकाच कुटुंबातील तीन, तर दोन वेगवेगळ्या कुटुंबातील प्रवाशांचा समावेश होता. पहिल्या तीनपैकी पती-पत्नी असे दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. परंतु, तिसऱ्या सदस्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तसेच इतर दोन प्रवाशांचाही अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु, दुसऱ्यांदा केलेल्या तपासणीत तीनपैकी एकाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात ४४ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर १२ अॅक्टीव रुग्ण आहेत, तर ३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले ४ रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. त्यातील दोन जण मुलचेरा, तर प्रत्येकी एक जण अहेरी व कुरखेडा तालुक्यातील आहे. या सर्वांंना आज घरी सोडण्यात आले.

गडचिरोली शहरात २७ मे रोजी मुंबईहून आलेल्या प्रवाशांपैकी आधी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या पती-पत्नीच्या परिवारातील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. यामुळे गडचिरोली शहरवासीयांची चिंता वाढत असतानाच चार जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details