गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १० जणांनी १८ नामांकन दाखल केले होते. दाखल करण्यात आलेल्या नामांकनांची मंगळवारी छाननी करण्यात आली. यात ४ उमेदवारांचे नामांकन रद्द करण्यात आले. तर ६ उमेदवारांचे नामांकन वैध ठरले आहेत. २८ मार्च हा नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
चिमूर लोकसभा : सहा उमेदवारांचे नामांकन वैध तर चौघांचे रद्द
चिमूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १० जणांनी १८ नामांकन दाखल केले होते.
छाननीअंती६ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. यामध्ये भाजपचे अशोक महादेवराव नेते, काँग्रेसचे डॉ. नामदेव दल्लूजी उसेंडी, बहुजन समाज पार्टीचे हरिचंद्र नागोजी मंगाम, आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाचे देवराव मोनबा नन्नावरे, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार बाबुरावजी गजभिये व अपक्ष म्हणून डॉ. एन. डी. किरसान यांचे नामांकन वैध ठरले आहे.
अपक्ष म्हणून नामांकन भरलेले दामोदर वानूजी नेवारे, गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या सुवर्ण बबनराव वरखडे, बहुजन मुक्ती पार्टीचे दिवाकर गुलाब पेंदाम व बहुजन समाज पार्टीचे पवन रामचंद्र मगरे यांचे नामांकन रद्द ठरवण्यात आले आहे. त्यामुळे अवैध ठरवण्यात आलेल्या चारही उमेदवारांना निवडणूक लढवता येणार नाही.