गडचिरोली - जिल्ह्यात शनिवारी 276 नवीन कोरोनाबाधित आढळून आले तर 550 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधित 27102 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 23624 वर पोहचली. तसेच सद्या 2863 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 615 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात 550 जण कोरोनामुक्त, 12 मृत्यूंसह 276 रुग्णांची नोंद - गडचिरोली कोरोना न्यूज
गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण कमी होत आहेत. जिल्ह्यात शनिवारी 276 बाधित नव्यानं आढळले असून 12 जणांचा मृत्यू झाला तर, 550 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 27,102 जणांना कोरोनाची लागण झाली होती.
शनिवारी झालेल्या 12 नवीन मृत्यूमध्ये ता. वडसा जि. गडचिरोली येथील 62 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 50 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 75 वर्षीय महिला, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 56 वर्षीय महिला, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, गडचिरोली येथील 48 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 50 वर्षीय महिला, ता.आरमोरी जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय महिला, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 62 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 68 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.17 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 10.56 टक्के तर मृत्यू दर 2.27 टक्के झाला आहे.
नवीन 276 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 75, अहेरी तालुक्यातील 29, आरमोरी 07, भामरागड तालुक्यातील 04, चामोर्शी तालुक्यातील 65, धानोरा तालुक्यातील 6, एटापल्ली तालुक्यातील 14, कोरची तालुक्यातील 11, कुरखेडा तालुक्यातील 7, मुलचेरा तालुक्यातील 13, सिरोंचा तालुक्यातील 14 तर वडसा तालुक्यातील 31 जणांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या 550 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 191, अहेरी 42, आरमोरी 63, भामरागड 11, चामोर्शी 46, धानोरा 15, एटापल्ली 24, मुलचेरा 17, सिरोंचा 21, कोरची 24, कुरखेडा 35 तसेच वडसा येथील 61 जणांचा समावेश आहे.