महाराष्ट्र

maharashtra

गडचिरोलीतील पूरग्रस्तांसाठी २४ कोटींचा निधी मंजूर

By

Published : Sep 30, 2020, 10:22 PM IST

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून गडचिरोली जिल्ह्यासाठी २४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. १ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरिस्थितीमुळे सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

गडचिरोली - १ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरिस्थितीमुळे सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून गडचिरोली जिल्ह्यासाठी २४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पातील सर्व दरवाज्यांमधून ५ मीटर पर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यात १९९५ साली ओढावलेल्या पूरापेक्षाही मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होऊन अनेक गावांत, शेतामध्ये पाणी शिरले. परिणामी नागरिकांचे, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या अनुषंगाने महसूल व वन विभागाने निधी मंजूरीचा शासन निर्णय निर्गमीत केला.

नागपूर विभागाच्या ६ जिल्हयातील मत्स्य बोटी व जाळ्यांसाठी तसेच मत्स्यबीज शेतीसाठी सहाय्य व मदत, मृत व जखमी व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर्णत: घराची क्षती झाली असल्यास कपडे, भांडी व घरगुती वस्तूंकरिता, शेतपिकांच्या नुकसान, मृत जनावर व घराची अंशत: पडझड झालेली कच्ची किंवा पक्की घरं, नष्ट झालेल्या झोपड्या आणि गोठ्याचे नुकसान, कारागीर, बाराबलुतेदार, दुकानदार व टपरी धारकांना मदत, जमिनीतील वाळू आणि चिकन माती क्षार काढून टाकण्यासाठी शेतकर्याना सहाय्य तसेच नदीच्या रूपांतरामुळे झालेले जमिनीच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सहाय्य, मोफत केरोसीन वाटपासाठी साहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी एकूण १६२ कोटी ८१ लाख ७ हजारचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात गडचिरोली जिल्हयासाठी २ हजार ४३७ लाख २९ हजार रूपये निधी मंजूर झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details