गडचिरोली - आलापल्ली येथील गोंडमोहल्यात सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एका २२ वर्षीय युवकाची क्रिकेटच्या बॅटने मारहाण करत त्याचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. उमेश सिद्ध कोडापे असे मृताचे नाव आहे. ही घटना अहेरी पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आलापल्ली येथील गोंडमोहल्यात एकाचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यात त्या तरुणाला बॅटने मारहाण करत खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी तपास चक्रे फिरवून एका आरोपीला अटक केली.