महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली : प्राणहिता नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू - two youths drowned in Pranahita river

आज दुपारी देवलमरी येथील प्राणहिता नदीच्या काठावर एक मोटारसायकल, चप्पल व कपडे आढळले. त्यानंतर पोलिसांनी नदीपात्रात शोध घेतला असता कुणाल म्हशाखेत्रीचा मृतदेह आढळून आला. महेश मादेशीच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे.

gadchiroli
मृत युवकांचे छायाचित्र

By

Published : Dec 22, 2019, 8:33 PM IST

गडचिरोली- अहेरी तालुक्यातील देवलमरी येथील प्राणहिता नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. महेश मादेशी (वय.२५) व कुणाल म्हशाखेत्री (वय.२३) अशी मृत युवकांची नावे असून ते आलापल्ली येथील रहिवाशी होते.

महेश मादेशी व कुणाल म्हशाखेत्री हे काल शनिवारी देवलमरी येथील प्राणहिता नदीकडे फिरायला गेले होते. परंतु, संध्याकाळपर्यंत दोघेही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. दरम्यान, आज रविवारी दुपारी देवलमरी येथील प्राणहिता नदीच्या काठावर एक मोटारसायकल, चप्पल व कपडे आढळले. त्यानंतर पोलिसांनी नदीपात्रात शोध घेतला असता कुणाल म्हशाखेत्रीचा मृतदेह आढळून आला. महेश मादेशीच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा-गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची ३ जानेवारीला निवड

ABOUT THE AUTHOR

...view details