महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Naxalites killed: बालाघाट मंडला जंगलात 2 नक्षलवाद्यांचा खात्मा - नैनगुढा गावचा रहिवासी

Naxalites killed: मध्यप्रदेशातील बालाघाट मंडला जिल्ह्याच्या सीमेवर जंगलात हॉक फोर्स सोबत झालेल्या चकमकीत 2 नक्षलीला मारण्यात यश आले आहे. भोरमदेव कमेटी पीएल-2 चा एसीएम कमांडर राजेश होता, तर दुसरा गणेश मडावी वर्ष 27 हा गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस Kotmi Police मदत नैनगुढा गावचा रहिवासी होता.

Naxalites killed
Naxalites killed

By

Published : Dec 1, 2022, 11:47 AM IST

गडचिरोली: मध्यप्रदेशातील बालाघाट मंडला जिल्ह्याच्या सीमेवर जंगलात हॉक फोर्स सोबत झालेल्या चकमकीत 2 नक्षलीला मारण्यात यश आले आहे. भोरमदेव कमेटी पीएल-2 चा एसीएम कमांडर राजेश होता, तर दुसरा गणेश मडावी वर्ष 27 हा गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत नैनगुढा गावचा रहिवासी होता.

घटनास्थळावरून फसार झाल्याची माहिती:तो विस्तार प्लाटून न. 3 चा सेक्शन कमांडर पदावर कार्यरत होता. त्याच्यावर मध्यप्रदेश 3 लाख, महाराष्ट्र 4 लाख, छत्तीसगड 5 लाख असे एकूण 12 लाखाचा बक्षीस जाहीर केले होते. तर एक महिला नक्षली घटनास्थळावरून फसार झाल्याची माहिती आहे. राजेश हा छत्तीसगडच्या झीरम घाटीच्या घटनेच मास्टर माईंड होता.

नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला: कान्हा नॅशनल पार्कच्या कोअर झोनमध्ये बुधवारी सकाळी हॉक फोर्सला सुपखारच्या जंगलात डझनभर नक्षलवादी असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. याची माहिती मिळताच हॉक फोर्सने एका ठराविक ठिकाणी छापा टाकला. हॉक फोर्स पाहून नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

ABOUT THE AUTHOR

...view details