गडचिरोली - धान रोवणीसाठी मजुरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन उलटल्याने १९ मजूर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (१२ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कुरखेडा-मालेवाडा मार्गावरील सालईटोला गावाजवळ घडली. जखमींमध्ये १३ महिलांचा समावेश असून, सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.
गडचिरोली : मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले, १९ जण जखमी - गडचिरोली अपघात बातमी
पेरणीसाठी मजुरांना घेऊन जाणारी मालवाहू जीप उलटल्याने १९ मजूर जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
पिंकी दरवडे (वय १८ वर्षे), जयंत दरवडे (वय २०), संगीता दरवडे(वय ३८), कविता देव्हारे (वय ३६), रामू देव्हारे (वय ४०) ,यादव शेंडे (वय ३५) ,हिना शेंडे (वय ३०), कुसूम नागोसे (वय ५०), मोनिका दरवडे (वय २०) ,गणेश नेवारे (वय २१), पूनम पंधरे (वय २०), गीता देव्हारे (वय ४०), गुड्डू नेवारे (वय ३०) ,सचिन मुंगणकर (वय २२), गोपिका दुमाने (वय ४०), योगिता राऊत (वय ३५), दर्शना सहारे (वय २५), इंदू मंडकाम (वय ४०), सरिता मेश्राम (वय ३५), जखमींची नावे आहेत.
यातील पिंकी दरवडे, यादव शेंडे, कुसूम नागोसे, मोनिका दरवडे, गणेश नेवारे व सरिता दुमाने या सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सर्व मजूर कुरखेडा तालुक्यातील वाघेडा येथील रहिवासी आहेत.
हे सर्व जण वाघेडा येथून एका पिकअप वाहनाने येंगलखेडा येथे धान रोवणीच्या कामासाठी जात होते. दरम्यान, सालईटोला गावाजवळ वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन उलटले. अपघाताचे वृत्त समजताच भाजपचे तालुकाध्यक्ष नाजुक पुराम, माजी तालुकाध्यक्ष राम लांजेवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.