गडचिरोली- यंदा लांबलेल्या परतीच्या पावसाने राज्यभरात मोठ्या प्रमाणात पिकांना फटका बसला आहे. सततच्या पावसाने जिल्ह्यातील 17 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामधील 16 हजार एकरांवरील पिकांचे 33 टक्क्यांहून जास्त नुकसान झाले असून, सर्वाधिक फटका एटापल्ली तालुक्याला बसला आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात 1 लाख 77 हजार 881 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. पीक अंतिम टप्प्यात असताना झालेल्या परतीच्या पावसामुळे शेती उध्वस्त झाली. तसेच वादळाने धान पडल्याने यंदा उत्पादनात कमालीची घट होणार आहे. दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये सोयाबीन व कापसासाही फटका बसला आहे.