महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 14, 2021, 12:43 PM IST

ETV Bharat / state

गडचिरोलीमध्ये पोहोचले कोरोनाचे १२ हजार डोस

राज्यासह देशात 16 रोजी पहिल्या टप्यातील कोरोना लसीकरणाला सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हयात 6 हजार कर्मचाऱ्यांना पहिल्या व 28 दिवसानंतरच्या दुसऱ्या अशा दोन्ही डोजसाठी 12 हजार डोजचा साठा उपलब्ध झाला. जिल्हयात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे.

12 thousand doses of corona vaccine reached Gadchiroli district
गडचिरोलीमध्ये पोहोचले कोरोनाचे १२ हजार डोस

गडचिरोली :महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्हयात कोरोना लसीचे 12 हजार डोज आज (गुरुवार) सकाळी 9 वाजता पोहचले. यावेळी लस वाहतूक करणाऱ्या गाडीचे स्वागत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर यांच्या उपस्थितीत झाले. 16 जानेवारी पासून जिल्हयात कोरोना लसीकरणाला शुभारंभ होत आहे.

गडचिरोलीमध्ये पोहोचले कोरोनाचे १२ हजार डोस

दोन टप्प्यासाठी लस उपलब्ध..

गेले वर्ष कोरोना संसर्गामुळे जगभर या लसीची प्रतिक्षा होती. राज्यासह देशात 16 रोजी पहिल्या टप्यातील कोरोना लसीकरणाला सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हयात 6 हजार कर्मचाऱ्यांना पहिल्या व 28 दिवसानंतरच्या दुसऱ्या अशा दोन्ही डोजसाठी 12 हजार डोजचा साठा उपलब्ध झाला. यानंतर उर्वरीत कर्मचाऱ्यांसाठी पुढील आठवडयात साठा उपलब्ध होणार आहे. आज आलेल्या 12 हजार कोरोना लस आवश्यक तापमानात ठेवण्यात आल्या आहेत.

शुभारंभ दिनी 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस..

जिल्हयात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार असून त्याचा शुभारंभ 16 जानेवारी रोजी होणार आहे. या दिवशी जिल्हयातील पाच लसीकरण केंद्रावर प्रत्येकी 100 कर्मचारी या प्रमाणे 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे.

हेही वाचा :कोविशिल्ड वाहतूक; कुल एक्सच्या संचालकांनी सांगितला रोमांचक अनुभव

ABOUT THE AUTHOR

...view details