महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 14, 2020, 6:47 PM IST

ETV Bharat / state

धक्कादायक! गडचिरोलीत आजपर्यंत 103 जवान कोरोना पॉझिटिव्ह

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा संसर्ग गडचिरोली जिल्ह्यातही हातपाय पसरत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 215 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये 103 हे जवान आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले काही जवान सुट्टी संपून आपल्या कर्तव्यावर परतले, तर काही जवान सीआरपीएफ बटालियनची तुकडी दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यानंतर जिल्ह्यात परतली होती.

gadchiroli corona update  gadchiroli soldiers corona positive  gadchiroli corona positive patients  गडचिरोली कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण  गडचिरोली कोरोना अपडेट  गडचिरोली लेटेस्ट न्यूज
धक्कादायक! गडचिरोलीत आजपर्यंत 103 जवान कोरोना पॉझिटिव्ह

गडचिरोली - जिल्ह्यात आतापर्यंत 215 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे 215 पैकी 103 रुग्ण हे केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दल व सीमा सुरक्षा दलाचे जवान आहेत. हे सर्व जवान दुसऱ्या जिल्ह्यातून प्रवास करून गडचिरोलीत दाखल झाले होते.

धक्कादायक! गडचिरोलीत आजपर्यंत 103 जवान कोरोना पॉझिटिव्ह

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा संसर्ग गडचिरोली जिल्ह्यातही हातपाय पसरत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 215 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये 103 हे जवान आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले काही जवान सुट्टी संपून आपल्या कर्तव्यावर परतले, तर काही जवान सीआरपीएफ बटालियनची तुकडी दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यानंतर जिल्ह्यात परतली होती. जिल्ह्यात नव्याने दाखल झालेल्या सर्व जवानांना संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. सर्व जवानांचे स्वॅब चाचणीसाठी घेतले होते. त्यावेळी अनेक जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या सर्व रुग्णांवर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी अनेक जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मंगळवारी एकाच दिवशी राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफ) तब्बल 29 जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. हे सर्व जवान धुळे जिल्ह्यात गेलेल्या तुकडीसोबत परतले होते. गडचिरोली जिल्ह्यात सीआरपीएफच्या पाच बटालियन कार्यरत असून अनेक जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने सीआरपीएफ मुख्यालयात मोठ्या प्रमाणात प्रतिबंध घालण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details