गडचिरोली -अतिदुर्गम मागासलेला भामरागड तालुक्यातही कोरोनाने हातपाय पसरले आहे. आदिवासी बहुल व अशिक्षिताचे प्रमाण जास्त असल्याने खेड्या पाड्यातील लोकांच्या मनात कोरोना व लसीकरण याविषयी प्रचंड दहशत आहे. अशात तालुका प्रशासनाच्य जनजाग्रुतीमुळे लस घेण्यास पुढे येऊन मौजा हिंदेवाडा गावात 100 टक्के लसीकरण झाले आहे.
हेही वाचा -शरद पवार यांचा सरकारला पूर्ण आशीर्वाद - संजय राऊत
कोरोना व लसीकरणासंदर्भात शहर, खेड्यातही नागरिकांच्या मनात अनेक प्रकारच्या शंका आहेत. त्यामुळे आजही खेड्यातील लोकं आजारी पडले तरी भीतीपोटी गावाच्या बाहेर पडायला तयार नाहीत. तालुक्यात प्रशासनाच्यावतीने गावा गावात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक गावात लसीकरण कॅम्प लाऊन लसीकरण करण्यात येत आहे. गावात कॅम्प घेऊनही पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. लसीकरणाकरिता टीम गावात गेली असता लोकं जंगलात निघून जातात किंवा घरात लपून बसतात. परंतु अशाही परिस्थितीत ग्रामपंचायत मलम्मपोडूर अंतर्गत येत असलेले व आदिवासी वस्ती असलेले हिंदेवाडा गावाने 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण करून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात वेगळा आदर्श तयार केला आहे. अर्थातच यासाठी प्रशासनाला खूप मेहनत घ्यावी लागली.
प्रशासकीय यंत्रणेकडून जनजागृती -