महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषी विद्यापीठाच्या मागणीसाठी युवासेनेच्या 'धुळे बंद'ला संमिश्र प्रतिसाद - dhule

कृषी विद्यापीठाच्या मागणीसाठी युवासेनेच्या 'धुळे बंद'ला संमिश्र प्रतिसाद... जळगावला कृषी विद्यापीठ देण्याची मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा... धुळ्यावर अन्याय झाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचा युवासेनेचा इशारा

'धुळे बंद'

By

Published : Mar 2, 2019, 6:38 PM IST


धुळे- कृषी विद्यापीठाच्या मागणीसाठी युवासेनेच्या वतीने आज धुळे बंदची हाक देण्यात आली होती. आजच्या या बंदला शहरातील नागरिकांसह व्यावसायिकांचाही संमिश्र प्रतिसाद मिळाला.

भुसावळ येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विद्यापीठ जळगावला देण्याबाबत घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला युवासेनेने विरोध केला असून कृषी विद्यापीठ धुळ्याला देण्यात यावे, अशी मागणी युवासेनेने केली आहे. या मागणीसाठी युवासेनेच्या वतीने शहरात आठवडाभर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर युवासेनेच्या वतीने 'धुळे बंद'ची हाक देण्यात आली होती.

'धुळे बंद'

या 'धुळे बंद'ला नागरिकांनी संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी काही वेळासाठी व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. मात्र, दुपारनंतर बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, कृषी विद्यापीठ धुळ्यालाच देण्यात यावे, अशी मागणी युवासेनेने लावून धरली आहे. धुळे जिल्ह्यावर अन्याय झाल्यास युवासेना हे आंदोलन आणखीन तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details