महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कौतुकास्पद..! 'त्या' धाडसी तरुणांनी चोराला रंगेहात पकडले, सेवानिवृत्त शिक्षिकेला पैसे मिळाले परत

शहरातील सेवानिवृत्त शिक्षिकेच्या हातातून तीन लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून पळ काढणाऱ्या एकाला दोन तरुणांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या दोन तरुणांच्या शौर्याबद्दल पोलिस प्रशासनाच्या वतीने या तरुणांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल

By

Published : Sep 12, 2019, 12:55 PM IST

तरूणांचा सत्कार करताना पोलीस अधिकारी

धुळे- शहरातील सेवानिवृत्त शिक्षिकेच्या हातातून तीन लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून पळ काढणाऱ्या एकाला दोन तरुणांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या दोन तरुणांच्या शौर्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने या तरुणांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी दिली.

माहिती देताना तरुण आणि पोलीस अधिकारी

धुळे शहरातील दत्त कॉलनीतील रहिवासी निवृत्त शिक्षिका विमलबाई पाटील या काल (बुधवार) युनियन बँकेच्या दत्त मंदीर शाखेतून तीन लाख रुपये काढून घरी जात होते. स्वामीनारायण रस्त्याने सुनील गुलाब मालचे या चोरट्याने त्यांच्या पाठीवर थाप मारून पिशवी हिसकावून पळ काढला. विमलबाई पाटील यांनी आरडाओरड केल्यानंतर वैभव उर्फ सोनू कोळी आणि हिरामण महादू गवळी या दोघा तरुणांनी गुलाब मालचे या चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

हेही वाचा - धुळ्यातील जवखेडा गावात छत कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू


या घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांनी गुलाबला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुलाब मालचे याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव उर्फ सोनू कोळी आणि हिरामण महादू गवळी या दोघांचा उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या दोघांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल पोलिस दलातर्फे त्यांना प्रशस्तीपत्रक दिले जाईल, तसेच प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल, अशी माहिती सचिन हिरे यांनी दिली आहे.

हेही वाचा - धुळ्यात तरूण शेतकऱ्याचा नाल्यात पडून मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details