महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू - electricity shock

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे विजेचा शॉक लागून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.

मृत निलेश पाटील

By

Published : Aug 3, 2019, 8:03 AM IST

Updated : Aug 3, 2019, 3:18 PM IST

धुळे - जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे विजेचा शॉक लागून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.

शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे शेतात विजेचा शॉक लागल्याने तरुण शेतकरी निलेश उर्फ बंटी नितीन पाटील (वय-३४) याला जबर दुखापत झाली. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास शेतात घडली. घटना लक्षात येताच आजुबाजूच्या शेतातील नागरिकांच्या मदतीने त्याला शिरपूर येथील कॉटेज रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे थाळनेर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Last Updated : Aug 3, 2019, 3:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details