धुळे- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आंबेडकरी अनुयायांच्या वतीने मनुस्मृतीचे दहनकरून स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला. स्त्रियांना धर्माच्या शोषणातून बाबासाहेबांनी मुक्त केले म्हणून हा दिवस स्त्रीमुक्ती दिन म्हणून राष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मनुस्मृतीचे दहन करुन धुळ्यात स्त्री मुक्ती दिन साजरा - dhule news
हिंदू धर्मातील मनुस्मृती या ग्रंथात स्त्रियांचे शोषण करणारे अनेक नियम व अटी सांगितल्या आहेत. या मनुस्मृती ग्रंथाचे 25 डिसेंबर 1927 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे दहनकरुन स्त्री मुक्तीची घोषणा केली. 25 डिसेंबर हा दिवस मनुस्मृतिदहन अर्थात स्त्री मुक्ती दिन म्हणून आंबेडकरी अनुयायी साजरे करतात.
हिंदू धर्मातील मनुस्मृती या ग्रंथात स्त्रियांचे शोषण करणारे अनेक नियम व अटी सांगितल्या आहेत. या मनुस्मृती ग्रंथाचे 25 डिसेंबर 1927 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे दहनकरुन स्त्री मुक्तीची घोषणा केली. 25 डिसेंबर हा दिवस मनुस्मृतिदहन अर्थात स्त्री मुक्ती दिन म्हणून आंबेडकरी अनुयायी साजरे करतात. या दिनाचे औचित्यसाधून धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ मनुस्मृतीचे दहनकरुन स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. स्त्रियांना धर्माच्या शोषणातून बाबासाहेबांनी मुक्त केले म्हणून हा दिवस स्त्रीमुक्ती दिन म्हणून राष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.