धुळे- जिल्ह्यातील शिरपूर येथे झालेल्या रसायन कंपनीच्या स्फोटात अनेक गरिबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या घटनेप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत मिळवून देणार असल्याचे आश्वसान शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांनी दिले.
धुळे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळवून देणार - आमदार काशीराम पावरा - dhule
शिरपूरजवळ असलेल्या वाघाडी गावाजवळ एका रसायन कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. ही घटना शनिवारी घडली. स्फोटात अनेक गरिबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या घटनेप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत मिळवून देणार असल्याचे आश्वासन शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांनी दिली आहे.

शिरपूरजवळ असलेल्या वाघाडी गावाजवळ एका रसायन कंपनीत भीषण स्फोट झाला होता. ही घटना शनिवारी घडली. या घटनेत परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या ठिकाणी असलेल्या अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबांचा गाडा चालवणाऱ्यांवर आज नियतीने ही वाईट वेळ आणली आहे. या ठिकाणी असलेल्या अनेक झोपड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या गोरगरीबांना आपला संसार पुन्हा उभा करावा लागणार आहे.
दरम्यान, घटनास्थळी शिरपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार काशीराम पावरा यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत मिळवून देण्यात येईल, अशी माहिती आमदार काशीराम पावरा यांनी 'ईटीव्ही भारत' बोलताना दिली.