महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Cotton theft Dhule : दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून २ हजार ४२५ किलो पांढरं सोनं चोरी, धुळे जिल्ह्यात कापूस चोरीच्या घटनेत वाढ - white gold stolen from two different places

धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून ७४ हजार २५० रुपये किंमतीचा २ हजार ४२५ किलो कापूस चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात धुळे तालुका तसेच दोंडाई पोलीस स्टेशनला अज्ञात कापूस चोरांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. increase in cotton theft in Dhule district. Cotton theft Dhule .

Cotton theft Dhule
पांढरं सोनं चोरी

By

Published : Oct 21, 2022, 7:55 PM IST

धुळे : धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून ७४ हजार २५० रुपये किंमतीचा २ हजार ४२५ किलो कापूस चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात धुळे तालुका तसेच दोंडाई पोलीस स्टेशनला अज्ञात कापूस चोरांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. increase in cotton theft in Dhule district. Cotton theft Dhule .

धुळे तालुक्यातील भदाणे शिवारातील शेतकरी ज्योतीराम जोगा यांनी धुळे तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार, १९ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास, शेतातील पत्राच्या शेड मध्ये पशुखाद्याच्या ६५ गोण्यांमध्ये भरून ठेवलेला, २ हजार २७५ किलो वजनाचा ५९ हजार २५० रुपये किंमतीचा कापूस चोरटयांनी चोरून नेला. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक महादेव गुटटे करत आहे.

अन्य एका घटनेत, दोंडाई पोलीस स्टेशन हद्दीतील मांडळ चौफुलीवरील एका व्यापारी संकुलातील, एका दुकानाचे शटरचे कुलूप तोडून १५ हजार रुपये किंमतीचा दीड क्विंटल कापूस चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद, अरुण रमेश धनगर या शेतकऱ्यानं दोंडाई पोलिस स्टेशन मध्ये दिलेली आहे. दिलेल्या माहीतीनुसार अज्ञात कापूस चोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास दोंडाई पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनारसिंग पवार हे करत आहेत. तर दोन आठवड्यांपूर्वीच साक्री तालुक्यात देखील कापूस चोरीच्या घटना घडल्या आहेत. धुळे जिल्ह्यात पांढरं सोनं अर्थात कापूस चोरीच्या घटनेत वाढ झाल्यानं ऐन दिवाळीत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. Cotton theft Dhule

ABOUT THE AUTHOR

...view details