महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळ्यात मान्सून लांबणीवर; आजही होतोय टँकरने पाणीपुरवठा - well

धुळे जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळ पडला आहे. दुष्काळामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली. मान्सून लांबणीवर पडल्याने धुळे तालुक्यात अजूनही टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. सध्या धुळे तालुक्यात २८ गावांमध्ये ४ शासकीय टँकरने तर २१ खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.

धुळ्यात मान्सून लांबणीवर

By

Published : Jun 26, 2019, 1:46 PM IST

धुळे - मान्सून लांबणीवर पडल्याने धुळ्यात आजही मोठ्या प्रमाणावर टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यंदा भीषण दुष्काळामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली. नागरिकांनी पाणी जपून वापरावे तसेच ज्या ठिकाणी टँकरची आवश्यकता असेल त्याबाबतची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

धुळ्यात मान्सून लांबणीवर

धुळे जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळ पडला आहे. दुष्काळामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली. मान्सून लांबणीवर पडल्याने धुळे तालुक्यात अजूनही टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. सध्या धुळे तालुक्यात २८ गावांमध्ये ४ शासकीय टँकरने तर २१ खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. तसेच १८ विहिरी गावासाठी आणि १० विहिरी टँकरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. साक्री तालुक्यात १५ गावांमध्ये २ शासकीय तर १७ खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. साक्री तालुक्यात ५५ विहिरी गावासाठी तर ४ विहिरी टँकरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तसेच शिंदखेडा तालुक्यात २६ गावांसाठी १० शासकीय टँकरने तर १२ खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. शिंदखेडा तालुक्यात ६३ विहिरी गावासाठी आणि २० विहिरी टँकरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जून अखेर पाणीपुरवठयासाठी प्रशासनाने ६० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details