महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुष्काळाच्या झळा : शिंदखेडा तालुक्यात पाणी टंचाई, ग्रामस्थांचे हाल

धुळे जिल्ह्यात एकूण २६ गावांना सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर एकट्या शिंदखेडा तालुक्यात १८ गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जलसाठे देखील कोरडे पडल्यामुळे येथे टँकरद्वारे नागरिकांची तहान भागविली जात आहे.

By

Published : Apr 25, 2019, 12:07 PM IST

शिंदखेडा तालुक्यात पाणी टंचाई, ग्रामस्थांचे हाल

धुळे - जिल्ह्यात यावर्षी झालेल्या असमाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात बहुसंख्य गावांना पाणी टंचाईची झळ बसू लागलेली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोनमैल पायपीट करावी लागते आहे. सध्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याच चित्र दिसत आहे.

शिंदखेडा तालुक्यात पाणी टंचाई

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने नियोजन करण्यास सुरुवात केलेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाचा निरीक्षण अहवाल आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सर्वेक्षणानंतर प्रशासनाने टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार मार्च ते एप्रिल २०१९ या कालावधीत ५५ गावे व ८९ वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसू शकते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५३१.६५ मी.मी असून, सप्टेंबर २०१८ अखेरपर्यंत ४०७ मी.मि पावसाची नोंद झालेली आहे. यात सर्वात कमी पाऊस हा शिंदखेडा तालुक्यात झालेला आहे. तेथील पावसाची टक्केवारी ६२.३४ एवढी आहे.

असमाधानकारक पाऊस झाल्याने, त्याचा परिणाम जलसाठ्यांवर होऊ लागला आहे. पावसाअभावी धरण १०० टक्के भरू शकली नाहीत. तर अनेक ठिकाणी आतापासूनच विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पाणी टंचाई भासण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या नियोजनानुसार मार्च ते एप्रिल २०१९ या दुसऱ्या टप्यात ५५ गावे व ८९ वाड्यांवर पाणी टंचाई असल्याचं समोर आलं आहे. या पाणी टंचाईमुळे शिंदखेडा तालुक्यातील ग्रामस्थ गाव सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. प्रशासनाने आमचा पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी या ग्रामस्थांकडून केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details