धुळे - धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरणात पाण्याचा साठा वाढत आहे. यामुळे धरणातून पांझरा नदीत १०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून १० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग - dhule
जिल्ह्यातील साक्री परिसरात गेल्या २ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरणात पाण्याचा साठा वाढला आहे. सोमवारी या अक्कलपाडा धरणातून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील साक्री परिसरात गेल्या २ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरणात पाण्याचा साठा वाढला आहे. सोमवारी या अक्कलपाडा धरणातून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना नदीकाठी न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. धुळे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील साक्री माळमाथा परिसरात दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे या भागातील जलप्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. धुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. यामुळे अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग पांझरा नदीत सुरू करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.