धुळे - जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या अक्कलपाडा धरणातून आज (रविवारी) दुपारी ५ हजार २४० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
धुळे: अक्कलपाडा धरणातून ५ हजार २४० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग - Akkalpada dam overfull
धुळे जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या अक्कलपाडा धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी साठा झाला आहे. त्यामुळे या धरणातून आज पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
गेल्या २ दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून साक्री तालुक्यात सर्वाधिक पाऊस सुरू आहे. या पावसामुळे साक्री तालुक्यात नदी-नाल्यांना पूर आला असून लाटीपाडा धरण 'ओव्हरफ्लो' झाले आहे. तसेच जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या अक्कलपाडा धरणात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठा झाला आहे. त्यामुळे या धरणातून आज पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
यंदा प्रथमच अक्कलपाडा धरण मोठ्या प्रमाणावर भरले आहे. त्यामुळे साक्री तालुका आणि माळमाथा परिसराला याचा सर्वाधिक फायदा होणार असून या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच धुळे शहराचा पाणी प्रश्न देखील पूर्णपणे मिटणार आहे. तर, साक्री तालुक्यात होत असलेल्या धुवाँधार पावसामुळे परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.