महाराष्ट्र

maharashtra

धुळे: लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त ६ टक्के जलसाठा शिल्लक

आत्तापर्यंत धुळे जिल्ह्यात ४५ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त ६ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

By

Published : Jul 25, 2019, 11:07 PM IST

Published : Jul 25, 2019, 11:07 PM IST

धुळ्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त ६ टक्के जलसाठा शिल्लक

धुळे - जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त ६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्याला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत धुळे जिल्ह्यात ४५ टक्के पाऊस झाला आहे. अजूनही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

धुळ्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त ६ टक्के जलसाठा शिल्लक
धुळे जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळ अनुभवयाला मिळाला. गेल्या वर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. या वर्षीही जुलै महिना संपत आला आहे, तरी देखील जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे धरणांमध्ये पुरेसा जलसाठा निर्माण झालेला नाही. धुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त ६ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. चांगला पाऊस झाल्यास धरणांमधील पाण्याची पातळी वाढू शकते. अन्यथा नागरिकांना येत्या काळात पुन्हा भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल. सध्या जिल्ह्यात २१ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. भर पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याने, नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करून धुळे जिल्ह्याचा पाणी प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details