महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dry Borewell: निसर्गाचा चमत्कार; कोरड्या बोरवेल मधून बाहेर निघतंय पाणी

Dry Borewell: यंदा राज्यात सरासरीच्या तुलनेनं अधिक पर्जन्यमान झाले आहे. परिणामी बहुतांश ठिकाणी शेतातील पिकांचं नुकसान झाले आहे. सरासरी पेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्यानं भूगर्भातील जलपातळीत कमालीची वाढ Extreme rise in water level झाली. याचा प्रत्यय याची देही याची डोळा धुळे जिल्ह्यातील कापडणे गावातील ग्रामस्थ अनुभवत आहे. गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात साधारण साडेपाचशे फूट खोल असलेला मात्र पूर्ण कोरडा असलेल्या (पाणी न लागल्याने बंद असलेला) बोरवेलमधून पाणी बाहेर निघून वाहत आहे. हा निसर्गाचा चमत्कार Miracle Of Nature पाहून ग्रामस्थ देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

Dry Borewell
Dry Borewell

By

Published : Oct 6, 2022, 4:56 PM IST

धुळे: यंदा राज्यात सरासरीच्या तुलनेनं अधिक पर्जन्यमान झाले आहे. परिणामी बहुतांश ठिकाणी शेतातील पिकांचं नुकसान झाले आहे. सरासरी पेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्यानं भूगर्भातील जलपातळीत कमालीची वाढ Extreme rise in water level झाली. याचा प्रत्यय याची देही याची डोळा धुळे जिल्ह्यातील कापडणे गावातील ग्रामस्थ अनुभवत आहे. गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात साधारण साडेपाचशे फूट खोल असलेला मात्र पूर्ण कोरडा असलेल्या (पाणी न लागल्याने बंद असलेला) बोरवेलमधून पाणी बाहेर निघून वाहत आहे. हा निसर्गाचा चमत्कार Miracle Of Nature पाहून ग्रामस्थ देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

कोरड्या बोरवेल मधून बाहेर निघतंय पाणी

ग्रामस्थांमध्ये कुतूहलधुळे जिल्ह्यातील कापडणे येथील बिलाडी रोडवरील युवा शेतकरी नितीन बाबुराव माळी यांच्या शेती क्षेत्रात तब्बल ५३० फूट खोल बोरवेल आहे. मात्र या बोरवेल पाणी लागलं नसल्यानं तो बंद स्थितीत होता. गेल्या काही दिवसांपासून या बंद स्थितीतील बोरवेल मधून अचानक पाणी बाहेर येत असल्याने ग्रामस्थांमध्ये या विषयी कुतूहल निर्माण झाले आहे. बिना इलेक्ट्रिक कनेक्शन, इलेक्ट्रिक पंप शिवाय या बोरवेल मधून पाणी बाहेर वाहत आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला.

निसर्गाचा हा चमत्कार तसेच परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे कापडणे परिसरात सर्वत्र अतिवृष्टी झाल्यामुळे नदी, नाले, ओढे, कोल्हापुरी बंधारे हे पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे परिसरातील भूगर्भातील जल पातळीत देखील मोठी वाढ झाल्याने भूगर्भातील खडकातील, सचिद्र भागात अर्थात झिरप्यांची पाणी साठवण्याची क्षमता संपल्याने जमिनीतील पाणी मिळेल. या पोकळीतून बोरवेलच्या माध्यमातून जमिनीवर येत आहे. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत आहे. निसर्गाचा हा चमत्कार ग्रामस्थांमध्ये कुतूहलाचा विषय झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details