धुळे- विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील वारकरी, कलावंतांच्या वतीने जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजकल्याण अधिकाऱयांना विविध मागण्यांबाबतचे निवेदनही सादर करण्यात आले आहे.
विविध मागण्यांसाठी वारकरी-कलावंतांचा जिल्हा परिषदेत ठिय्या
प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील वारकरी, कलावंतांच्या वतीने जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजकल्याण अधिकारी श्रीयुत ढिवरे यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले आहे.
वारकरी-कलावंतांचे थकीत मानधन देणे, वारकरी कलावंतांचे मानधन ५ हजार रुपये करणे आणि शासनाच्या योजनांच्या जनजागृतीसाठी पथनाट्ये सादर करण्याचे काम वारकरी कलावंतांना देणे. अशा विविध मागण्यांबाबत वारकरी कलावंतांच्या वतीने धुळे जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरण यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.
कलावंताच्या मानधनाबाबत वारंवार सांगून देखील ते अद्याप मिळाले नसल्याने वारकरी कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे मानधन त्वरित मिळावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वारकरी कलावंतांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी समाजकल्याण अधिकारी श्रीयुत ढिवरे यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले आहे.