धुळे - संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात आज (सोमवारी) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मात्र, शहरात मतदान करताना अनेक नागरिक ईव्हीएम मशीनचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. यामुळे गुप्त मतदानाला काळिमा फासला जात आहे. तर या प्रकाराकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
हेही वाचा -'आम्ही आहोत मदतीला सर्वांनी मतदान करा', वांद्र्यातील बाल मतदार मित्रांचे आवाहन
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदान केंद्रात जाताना मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे. मात्र, असे असताना देखील काही उमेदवारांच्या समर्थकांकडून मतदान करतानाचे फोटो सर्रासपणे काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. याकडे निवडणूक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, यावर निवडणूक आयोग काय कारवाई करत हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा -दिवस मतसंग्रामाचा : विखे-थोरात कुटुंबीयानी बजावला मतदानाचा हक्क
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.
हेही वाचा -विरोधी पक्ष दिसतच नाही, निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेचे वर्चस्व - पियूष गोयल
या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.