महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे : मतदानासाठी कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप - महाराष्ट्रा विधानसभा निवडूक 2019

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी 16 लाखाहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी धुळे शहरात 249 मूळ मतदान केंद्रात 37 सहाय्यकारी मतदान केंद्र असणार आहेत.

मतदानासाठी कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप

By

Published : Oct 20, 2019, 5:22 PM IST

Updated : Oct 20, 2019, 5:42 PM IST

धुळे - विधानसभा निवडणुकीसाठी धुळे शहरातील गरुड हायस्कुल आणि शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय याठिकाणी कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याच वाटप करण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी धुळे जिल्हयात 16 लाखाहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदानाच्या तयारीचा आढावा घेताना आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी 16 लाखाहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी धुळे शहरात 249 मूळ मतदान केंद्रात 37 सहाय्यकारी मतदान केंद्र असणार आहेत. धुळे ग्रामीणसाठी 370 मूळ मतदान केंद्र आणि दोन सहाय्यकारी मतदान केंद्र असणार आहेत. साक्रीत 365 मूळ मतदान केंद्र आणि तीन सहाय्यकारी मतदान केंद्र असणार आहेत. शिंदखेडा येथे 338 मूळ मतदान केंद्र आणि दोन साहाय्यकारी मतदान केंद्र, शिरपूर येथे 323 मुळे मतदान केंद्र आणि सहाय्यकारी मतदान केंद्र असे एकूण 1 हजार 645 मूळ मतदान केंद्र आणि 50 सहाय्यकारी मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

हेही वाचा - राज्यातील पहिला मतदार गुजरातचा रहिवासी, आयोगाचा भोंगळ कारभार

संपूर्ण जिल्ह्यात 17 संवेदनशील मतदान केंद्र असणार आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच निवडणूक आयोगाने भरारी पथक आणि स्थिर पथकाची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा - नव्या भावांनी आमच्या नात्यात विष कालवलं, असं जीवन अन् राजकारणही नको; धनंजय मुंडे भावुक

Last Updated : Oct 20, 2019, 5:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details