धुळे- लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शहरातील शासकीय गोदामात होणार असून प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणीसाठी १९ फेऱ्या होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मतमोजणीच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
धुळे मतदारसंघ; मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण, परिसरात कडेकोट बंदोबस्त - तयारी पूर्ण
धुळे लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात मतदान पार पडले होते. धुळे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शहरातील शासकीय गोदामात होणार असून या मतमोजणीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण १२० टेबल असतील.
धुळे लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात मतदान पार पडले होते. धुळे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शहरातील शासकीय गोदामात होणार असून या मतमोजणीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण १२० टेबल असतील. टपाली आणि इटीबीपीएस मतमोजणीसाठी १५ टेबल असतील. प्रत्येक टेबलावर ४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. मुख्य निवडणूक निरीक्षक अलककुमार सहारिया यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या होतील. त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट चिठ्यांची मतमोजणी होणार आहे. फेरीनिहाय मतमोजणीची माहिती भारत निवडणूक आयोगाच्या सुविधा या अँपवर भरण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे एकंदरीत मतमोजणीची तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे.