धुळे - शहरातील देवपुरात असलेल्या शिवाजी मराठा बोर्डिंग जवळ रस्ता दुभाजकावर २०१८ सालच्या मतदार याद्या बेवारस पडलेल्या आढळून आल्या आहेत. यामुळे प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
प्रशासनाचा निष्काळजीपणा, दुभाजकावर पडल्या बेवारस मतदार याद्या - मतदार यादी
शहरातील देवपुरात असलेल्या शिवाजी मराठा बोर्डिंग जवळ रस्ता दुभाजकावर २०१८ सालच्या मतदार याद्या बेवारस पडलेल्या आढळून आल्या आहेत. यामुळे प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे.
धुळे शहरातील देवपूर भागात एसएसव्हीपीएस महाविद्यालय परिसरातील शिवाजी मराठा बोर्डिंग समोर असलेल्या रस्ता दुभाजकावर २०१८ सालच्या विविध विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या बेवारस अवस्थेत आढळून आल्या आहेत. या मतदारयाद्यांमध्ये साक्री, धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा या विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे याकडे प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याचे लक्ष गेले नाही. या मतदारयाद्या पावसामुळे पूर्णपणे ओल्या झाल्या असून बेवारस अवस्थेत आढळून आल्या आल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.