महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dhule Bus Breakdown Video महामार्गावर अंधारात लाईटविना धावली एसटी बस, व्हिडिओ Viral - धुळे बस व्हिडिओ

सध्या सोशल मीडियावर नाशिक धुळे बस क्रमांक एम एच २० बी एल ३४६७ या विनावाहक बायपास एसटी बसचा Dhule bus breakdown Video साधारण एक मिनिटाचा व्हिडीओ वायरल झाला आहे. हा व्हिडीओ १८ ऑगस्टचा असल्याची चर्चा आहे. एसटी बसचे पुढचे लाईट ज्याला हेडलाईट असे म्हणतात. तेच बंद असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यासाठी चालकाला किती कसरत करावी लागली हे या व्हिडिओमधून दिसून येत आले आहे.

Dhule Bus
Dhule Bus

By

Published : Aug 22, 2022, 5:24 PM IST

धुळे -एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. एरवी आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्याच तुघलकी परिपत्रकाचा धाक दाखवून धाकात ठेवणाऱ्या एसटी प्रशासनाने एसटी बसेसच्या देखभाल, दुरुस्ती विभाग एसटी प्रशासनाच्या परिपत्रकाचा किती आदर करते हे तपासून पाहावे. सध्या सोशल मीडियावर नाशिक धुळे बस क्रमांक एम एच २० बी एल ३४६७ या विनावाहक बायपास एसटी बसचा Dhule bus breakdown Video साधारण एक मिनिटाचा व्हिडीओ वायरल झाला आहे. हा व्हिडीओ १८ ऑगस्टचा असल्याची चर्चा आहे. एसटी बसचे पुढचे लाईट ज्याला हेडलाईट असे म्हणतात. तेच बंद असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यासाठी चालकाला किती कसरत करावी लागली हे या व्हिडिओमधून दिसून येत आले आहे.



प्रवाशांचे चालकाला सहकार्य :या बसमधील प्रवाशांनी चालकाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहत बस चालकास सहकार्य केले. बस चालकाने खासगी गॅरेज वाल्याकडून ते बंद हेडलाईट सुरु करून घेतले. ही बस नाशिककडून धुळ्याकडे जात होती. या बसचे केवळ पुढचे हेड लाईटच नव्हे तर मागील बाजूस असलेले लाईट देखील बंद असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी प्रश्न हा उपस्थित होतो की, एसटी बसचा अपघात झाल्यास त्याचं सर्व खापर चालकाच्या माथी फोडणार एसटी प्रशासन एसटी बसची देखभाल, दुरुस्ती, मेंटेनन्स बघणाऱ्या विभागाकडे सोयीस्कर दुर्लक्ष का करते? आतातरी एसटी प्रशासनानं जागे व्हावे, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या वर्कशॉप विभागातील काम चुकारपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी. या घटनेत चालकाचा काहीच दोष नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. शिवाय या घटनेनंतर प्रवाशांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

हेही वाचा -Fatal Accident in Kasara Ghat कसारा घाटात केळीचे ट्रक व टेम्पोमध्ये भीषण अपघात, अपघातात एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर

ABOUT THE AUTHOR

...view details