महाराष्ट्र

maharashtra

धुळ्यातील साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

By

Published : May 14, 2020, 1:12 PM IST

एकीकडे कोरोना आजाराचे वैश्विक संकट आलेले असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे,

rain in sakri dhule
धुळ्यातील साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

धुळे- जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यात एका घराची भिंत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

धुळ्यातील साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

एकीकडे कोरोना आजाराचे वैश्विक संकट आलेले असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे झाडे पडली असून एक तास झालेल्या जोरदार पावसात वारसा फाटा येथील एका व्यक्तीचा अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला आहे. तसेच काही ठिकाणी घरांचीदेखील पडझड झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details